आता पशूधनावर संकट : आडगाव शिवारातील शेतातून बैल लांबवला
Now there is a crisis on livestock: Bull was removed from the farm in Adgaon Shivar यावल : तालुक्यातील आडगाव गावातील शेतकर्याने शेतात आपला बैल बांधला असता अज्ञात चोरट्याने 20 हजार रुपये किंमतीचा बैल लांबवला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकर्यावर हंगामात संकट
आडगाव, ता.यावल येथील रहिवाशी समीर नजीर तडवी या शेतकर्याचे आडगाव शेत शिवारात शेत आहे. त्याने शेतात आपली बैलजोडी बांधली होती. त्यातील 20 हजार रुपये किंमतीचा एक बैल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहेत.
