पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून शिरसाडच्या माय-लेकास मारहाण
Mai-Leka of Shirsad beaten up on suspicion of having an immoral relationship with his wife यावल : तालुक्यातील शिरसाड गावातील एका 32 वर्षीय तरुणाला पत्नीशी बोलतो व तिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने वाद घातल्यानंतर चौघांनी तरुणासह याच्या आईला मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडैआठ वाजता शिरसाड येथे घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
शिरसाड, ता.यावल या गावातील एका 32 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गावातीलच सुधाकर बबन बडगुजर यांनी पत्नीशी फोनवर बोलतो व तुझे अनैतिक संबंध आहे या संशयावरून त्याच्याशी वाद घातला व सुधाकर बबन बडगुजरसह रोहिदास अर्जुन पाटील, लिलाधर उर्फ गबू गोकुळ अलकारी आणि सागर लहू भालेराव या चौघांनी त्याला मारहाण केली. या भांडणात फिर्यादी यांची आई भांडण सोडवण्यास गेली असता तिलादेखील त्यांनी मारहाण केली व या चौघांनी महिलेचा विनयभंग केला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध मारहाण करून विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
