नाहाटा महाविद्यालयातील राष्ट्रीय परीषदेत 44 शोधनिबंधांचे वाचन


भुसावळ : भुसावळ कला,विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातवनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे New Frontiers in Biological Sciences NFBS – 2020 या विषयावर सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परीषदेत े15 संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी सहभागी झाले तर 44 संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन महेश फालक, कोषाध्य जयकुमारजी नाहाटा यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी सचिव विष्णू चौधरी होते. प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, विद्यापीठ प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ प्रमुख डॉ.पी.एस.लोहार, विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ सदस्य डॉ.एस.ए.पाटील, परीषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, डॉ.संध्या सोनवणे, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन, डॉ.एम.जी.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के. हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव यांची उपस्थिती लाभली.

चार सत्रात परीषद
प्रथम सत्रात प्रा.डॉ.पी.एस.लोहार यांनी संगणकाचे वर्गीकरण शास्त्रातील योगदान या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात डॉ.एस.ए.पाटील यांनी बायोपायरसी : मोनोपोलीझिंग नॅचरल रिसोर्सेस यांनी या विषयावर पॉवरपॉइन्टच्या साहाय्याने मार्गदर्शन केले तृतीय सत्रात संशोधक शोधनिबंधांचे वाचन तसेच पोस्टर प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम- ज्योती अशोक पांडे, द्वितीय- सुभद्रा एम.चावराई तर तृतीय क्रमांक राजश्री नरेंद्र पाटील यांनी पटकावला. शोधनिबंध वाचनात प्रथम क्रमांक आनंद एस. जाधव, द्वितीय क्रमांक महेंद्रकुमार रमेश शिरसाठ यांनी पटकावले. चौथ्या सत्रात परीषदेचा समारोप झाला. उपप्राचार्य व परीषदेचे संयोजक डॉ.एस.व्ही.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.एन.पाटील, डॉ.शिरीष झांबरे, डॉ.एस.आर.महाजन, डॉ.एम.जी.पाटील उपस्थित होते. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एम.जे.जाधव यांनी करून आभार मानले.

यांनी घेतले परीश्रम
संयोजक उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, सहसंयोजक डॉ.डी.के.हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव, प्रा.ज्योती जंगले, प्रा.डी.एन.बोरीकर, प्रा.मोहिनी पाटील, प्रा.तुषार चौधरी, प्रा.देवेंद्र पाटील, प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.शंकर पाटील तसेच विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !