मुक्ताईनगरात भीषण अपघात : मध्यप्रदेशातील क्लीनर अपघातात ठार
Fatal accident in Muktainagar: Madhya Pradesh cleaner killed in accident मुक्ताईनगर : शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने उभ्या ट्रकला धडक दिल्याने मध्यप्रदेशातील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटे दोन वाजेच्या समारास घडला. बदामसिंग चव्हाण (34, रा.पिंप्रीखेडा, ता.बडवानी, जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे.
पाठीमागून धडकली आयशर
शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रक (एम.पी.09 एच.एच. 6443) हा बंद पडल्यानंतर काय बिघाड झाला हे पाहण्यासाठी ट्रकमधील क्लीनर बदामसिंग हरनामसिंग चव्हाण हा खाली उतरल्यानंतर ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ते दुरुस्ती करीत असताना भरधाव आयशर (जी.जे.03 बी.वाय.1887) पाठीमागून धडकल्याने उभा ट्रक हा पुढे ढकलला जाऊन बदामसिंग चव्हाण (34, पिंप्रीखेडा, ता.बडवानी) याच्या पायासह डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आयशर चालकाने पलायन केले. मुक्ताईनगर पोलिसात ट्रक चालक शिवम इंदरसिंग कनासे (19, रा.पिंप्रीखेडा, ता.बडवानी, जि.खरगोन, मध्यप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर (जी.जे.03 बी.वाय.1887) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेढे, अंमलदार संतोष चौधरी करीत आहेत.
