जामठीत टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला


रोकड सुरक्षित : पानटपरीतून एक हजारांच्या चिल्लरसह सिगारेट लांबवल्या

जामठी : बोदवड तालुक्यातील जामठी येथील टाटा इंडिकॅशचे एटीएम मशीन पाडून चोरट्यांनी त्यातील रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला असून एटीएममध्ये तीन हजार 500 रुपयांची रोकड सुरक्षित असल्याची माहिती आहे तर गावातील संदीप पान अ‍ॅण्ड कोल्ड्रिंग दुकानातून एक हजारांच्या चिल्लरसह सिगारेट पाकिटांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. जामठी गावातील शर्माजी कॉम्प्लेक्समध्ये टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम असून मंगळवारी पहाटे चोरट्यांनी एटीएम मशीन ठेवलेल्या दालनात प्रवेश करीत हे एटीएम खाली पाडून त्यातून रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही तर चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही तसेच डीव्हीआर फोडून त्याचे नुकसान केले आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी धाव घेतली तर एटीएममध्ये अवघी तीन हजार 500 रुपयांची रोकड शिल्लक होती व ती सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संदीप माळकर यांच्या मालकीचे संदीप पान अ‍ॅण्ड कोड्रिंक्स या दुकानातून एक हजारांच्या चिल्लरसह सिगारेट पाकिटे लांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !