सोशल मिडीयावर टाकला भावना दुखावणारा मजकूर : बामणोदच्या युवकाविरोधात पोलिसात गुन्हा
Hurtful content posted on social media : Police case against youth of Bamanod फैजपूर : सोशल मिडीयातील व्हॉटसअॅप स्टेटसवर दोन समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा मजकूर टाकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या शकील सलीम तडवी (25, इंदिरानगर, बामणोद) याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिली तक्रार
पोलीस शिपाई राहुल चौधरी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. हा प्रकार रविवारी दुपारी तीन वाजता घडला. दरम्यान, सोशल मिडीयावरील बारीक हालचालींवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष असून सोशल मिडीयाचा जपून वापर करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे.
