मुक्ताईनगरात बसमध्ये चढताना विवाहितेचे दोन लाखांचे मंगळसूत्र लांबवले
While boarding the bus in Muktainagar, the mangalsutra of two lakhs was extended to the married woman मुक्ताईनगर : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता मुक्ताईनगर बसस्थानकात घडली. या प्रकरणी केसर सुकदेव जाधव (50, चर्हाटा, ता.राजुरी, जि.बीड) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल
अंजली निलेश बाफना (40, शिवाजी नगर, संभाजीनगर, ह.मु.परेश ट्रेडर्सजवळ, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास त्या बसमध्ये चढत असताना संशयित आरोपी केसर जाधव याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे व दोन लाख 10 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तोडले व ते फेकून देत असताना महिलेच्या लक्षात आल्याने आरोपीला पकडण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
