सावदा बसस्थानकातून वृद्धेची 40 हजारांची पोत लांबवली


40,000 was extended to the old woman from Savada bus stand सावदा : उन्हाळी सुट्यांमुळे बस गाड्यांना वाढलेली गर्दी चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. सावदा बसस्थानकात बसमध्ये चढताना 63 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची पोत चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा कसून शोध सुरू
सखुबाई नारायण पाटील (63, कोचुर बु.॥ ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी 4.20 वाजता बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची पोत लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सावदा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास हवालदार उमेश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !