भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला सायबर भामट्याने घातला तीन लाखांचा गंडा


A railway employee in Bhusawal was extorted by cyber criminals of Rs 3 lakhs भुसावळ : भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याची सोशल मिडीयावरील खात्यावर लिंक पाठवून अज्ञात भामट्याने सुमारे तीन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा
मनोजकुमार सुनहरीलाल राज (45, भोईटे नगर, जळगाव) हे भुसावळ येथे रेल्वेस नोकरीला आहे. त्यांच्या सोशल मिडीयावरील टेलिग्राम खात्यावर अज्ञात भामट्यांनी युपीआयद्वारे लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख 94 हजार पाचशे रुपयांची रक्कम वळती केली. हा प्रकार 8 ते 12 मे दरम्यान घडला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !