रावेर मेस्टाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.संदीप पाटील


रावेर :  महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या रावेर मेस्टा तालुकाध्यक्षपदी डॉ.संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. इंग्रजी माध्यम शाळांच्या संघटनेची जिल्हास्तरीय सभा संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच हॉटेल के.पी.प्राईडमध्ये झाली. यामध्ये आदित्य इंग्लिश स्कूलचे चेअरमन डॉ.संदीप पाटील यांची रावेर तालुका तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. यावेळी मेस्टा जळगाव जिल्हाध्यक्ष नरेश चौधरी, प्रा.यशवंत पवार, उमाकांत ठाकुर, व्ही.टी.पाटील, आशिष अजमेरा, स्वप्निल पाटील, भिका चौधरी, शिवाजी शिंदे, मुकुंद कापुरे, विलास सपकाळे चोपडा, शशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील संचालक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !