यावलच्या विस्तारीत भागात घरफोडी : 74 हजारांचे दागिने लंपास
यावल : शहरात चोरट्यांनी पुन्हा बंद घरांना लक्ष करीत विस्तारीत भागात घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे. आधी कृष्णतारा नगरात 10 जानेवारीच्या रात्री तर आता 11 जानेवारीच्या रात्री व्यासनगरात घरफोडी होत 74 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले आहेे तर या घरफोडीमुळे शहरातील विस्तारीत भागातील नागरीक भयभीत झालेले आहे. शहरात 10 जानेवारीच्या रात्री कृष्णतारा नगरात पाच घरफोडली गेली होती तेव्हा ही घटना ताजी असतांनाच पुन्हा विस्तारीत भागातचं व्यासन गरातील रहिवासी जमील अब्दुल पिंजारी हे हज यात्रेसाठी गेलेले होते तर त्यांची पत्नी निलोफर पिंजारी ही 10 जानेवारीला घराला कुलूप लावुन माहेरी चोपडा येथे गेल्याने 11 जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या घराचे कुलूप तोडून प्रवेश करून 59 हजार दोनशे रुपयाची सोन्याच्या 40 ग्रॅमचे दागीने व दहा ग्रॅमची पोत असे 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हे दागीने घरातील कपाटात ठेवले होते. ते काढून सर्व सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आला तर संसारोपयोगी साहित्याची नासधूस चोरट्यांनी केलेली दिसली तर याबाबत निलोफर पिंजारी या 12 जानेवारी रोजी घरी आल्या असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

