यावलमध्ये देवतांची विटंबना : दोघांविरुद्ध गुन्हा
यावल : शहरातील एका पंथाच्या देवतांच्या मुर्तींची विटंबना केल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी घडली.
शहरातील महाजन गल्लीतील मंदिरातील मूर्तीची पुंडलिक महारू बारी व कमलाकर पुंडलिक बारी या पिता-पुत्रांनी विटंबना केल्याचा आरोप आहे. किरण साळी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

