भुसावळातील प्रलंबित घरकुलांचा प्रश्‍न मार्गी लावा


भारीप वंचित बहुजन आघाडीची पालिका प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील दलित वस्तीतील अनेक गरजु शहरवासीयांनी अनेक दिवसांपासून घरकुल मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केा असून यातील अनेक प्रकरणे जवळपास वर्ष दोन वर्षा पासून प्रलंबित आहे. नागरीक सतत नगरपालिका बांधकाम विभागाच्या येरझार्‍या करून वैतागले असतानाही परंतु नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात पंचशील नगरातील महिला व नागरीकांनी नगरपालिका गाठत बांधकाम विभागातील अभियंता पंकज पन्हाळे यांची भेट त्यांना उभय प्रश्‍न लक्षात आणून दिला.

प्रश्‍न न सुटल्यास तीव्र आंदोलन
जनतेची हेळसांड थांबवण्यासाठी तत्काळ घरकुल प्रकरणे मंजूर करून त्वरीत बांधकामे सुरू करावी, अशी मागणी भारीप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. यावेळी अभियंता पंकज पन्हाळे यांनी जातीने लक्ष घालून घरकुल प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी हमी दिली.
यावेळी भारीप जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, अरूण नरवाडे, पंकज बोदडे, दीपक सुरवाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, जनतेच्या हिताचा प्रश्‍न तत्काळ न सोडवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !