कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा पतीनेच केला खून
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून सारीका विठ्ठल महानूर (21) या गर्भवती महिलेचा पतीनेच खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खून करून आरोपी पती विठ्ठल बलभीम महानूर (25, रा. डाळिंबा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हा पसार झाला. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वडणगे-निगवे मार्गावरील रूपाली हॉटेलच्या दुसर्या मजल्यावर ही घटना घडली. संशयित हा पत्नी सारिकाची आत्महत्या भासवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु त्याला ते शक्य झाले नाही. त्याने खून कोणत्या कौटुंबिक कारणातून केला, हे तो सापडल्यानंतर उलगडा होणार आहे.
करवीर पोलिसांची घटनास्थळी धाव
सारीकाने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी विठ्ठलने छताच्या हुकाला ओढणी बांधून मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत अडकविण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला ते शक्य झाले नाही त्यामुळे मृतदेह बेडवर टाकून तो पळून गेला. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमालक राजू महानूर हे दुसजया मजल्यावर गेल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी सारिकाच्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर करवीर पोलिसांना वर्दी दिली.

