भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी वृद्धाचा मृत्यू
भुसावळ- रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग खिडकीजवळ बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास 70 ते 75 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. याबाबत ऑन ड्युटी डीवायएसएस यांनी खबर दिल्यावरून भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखीच्या अंगात राखाडी रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची पँट आहे. अनोळखीबाबत ओळख पटत असल्यास तपासाधिकारी एएसआय अरुणा कोहरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
