भुसावळात पोलिस बंदोबस्तात दीनदयालनगरातील अतिक्रमित घरे हटवण्यास सुरुवात


महामार्ग चौपदरीकरणासाठी घरे पाडण्यास सुरुवात : डोळ्यापुढे पडणारी घरे ाहून अनेकांना गहिवरले

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती आल्याने या मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी दीनदयालनगरातील 99 घरे गुरूवारी सकाळी आठ वाजता पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात झाली. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी बंदोबस्तात मंगळवारी मोजमाप करून जागेची आखणी केल्यानंतर गुरुवारी घरे पाडणार असल्याची रहिवाशांना कल्पना दिल्याने बुधवारीच अनेकांनी घरे रीकामी केली होती तर काही रहिवाशांच्या घरात सामान असल्याने त्यांनी गुरुवारी तो बाहेर काढला तर डोळ्यासमक्ष पडणारी घरे पाहून अनेकांना गहिवरून आले.

चौघांच्या मोबदल्याबाबत संघर्ष
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दीनदयाल नगरातील 99 घरे ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने घर मालकांशी चर्चा करून त्यांना मोबदला देण्यात आला होता मात्र चंद्रकांत चौधी यांच्यासह चौघांनी मोबदला नाकारला न्यायालयीन लढाई सुरू असल्याने गुरुवारी व्हिडिओ पंचनामा करून घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली.




पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
गुरुवारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, आरसीपी प्लाटून, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी, डीबी पथकातील सुमारे शंभर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पाच जेसीबीच्या सहाय्याने घरे पाडण्याच्या कामास सकाळी आठ वाजता सुरूवात करण्यात आली. महामार्ग चौपदरीकरणामुळे नाहाटा चौफुलीचा परिसर अधिक मोकळा होणार आहे. त्यामुळे वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे दूर होतील. याच पार्श्वभूमीवर दीनदयाल नगरातील घरांचे मोजमाप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !