युवकांनी राष्ट्रनिर्मिती कार्यात पुढाकार घ्यावा


खासदार रक्षा खडसे : भुसावळात स्वामी विवेकानंद युवा परीषद

भुसावळ- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र संलग्न संस्था संस्कृती फाउंडेशनमार्फत स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय युवक परिषदेचे आयोजन करण्यात आले. भारत हा युवकांचा देश असून या देशाला युवकांकडून काही अपेक्षा आहे राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन खासदा रक्षा खडसे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारे, युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर, शांतीवन ह्या समाजसेवी संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे, अमरेकेतील प्रिंस्टोन विद्यापीठातील समाजसेवी युवती अनाम वडगामा व संस्कृती संस्थाध्यक्ष रणजितसिंग राजपूत तसेच संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांची उपस्थिती होती. राज्य तथा देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्‍या 40 युवकांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
प्रसंगी आमदार संजय सावकारे, अनाम वडगामा व दीपक नागरगोजे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी मेहनत रणजीतसिंग राजपूत, अजित गायकवाड, हर्षवर्धन बाविस्कर, तुषार गोसावी, भाग्यश्री बाविस्कर, मानसी खडके, संस्कार मालवीया, अश्फाक तडवी, पवन कोळी, सौरभ रणदिवे, पल्लवी डांबरे, नम्रता चांडक, तेजस गांधेले, तेजस्वी पाटील, गीतिका कोरी, यामिनी महाजन, किर्तीशा पाथरवट, दीपक पाटील, सीमा अधळकर, हर्षल बोरणवर, दीपक पाटील, काजल तायडे, हुसेन तडवी, निखिल मोरे, जितेश टाक, संकेत सोनार, रोहीत खैरनार, आशिष पगारे, सोनू तडवी, मंगेश भावे, विशाल पटेल, जितेंद्र पवार, अक्षय पाटील आदींनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत तर सूत्रसंचालन सतीश कुलकर्णी तसेच आभार प्रदर्शन क्रितिषा पाथरवट यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !