जळगाव वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर मुख्यालयी जमा


ट्रॅव्हल्स चालकांकडून हप्ता मागणीच्या तक्रारीची पोलिस अधीक्षकांकडून दखल

जळगाव- ट्रॅव्हल्स चालकांकडून हप्ता वाढवून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आल्यानंतर अधीक्षकांनी स्वत: या प्रकरणात चौकशी केल्यानंतर सोमवारी रात्री कुनगर यांना मुख्यालयात जमा केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गतवर्षी वाहतूक पोलिस शाखेची जबाबदारी सांभाळलेले कुनगर यांच्या कार्यकाळात प्रशासकीय कामांत हलगर्जीपणा झाल्याचे वरीष्ठांच्या निदर्शनास आले होते. या शिवाय वाहतूक शाखेच्या आवारात एका वाळू व्यावसायकाचा वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. यावेळी तत्कालीन पोलिस अधीधक्षक दत्ता शिंदे यांनी दोन कर्मचार्‍यांना निलंबीत केले होते. या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कुनगर यांचीदेखील हजेरी होती. काही फोटोंमध्ये कुनगर दिसून येत होते परंतू त्यावेळी कुनगर यांच्यावर कारवाई झालेली नव्हती. याप्रकरणात त्यांची चौकशी सुरू होती तसेच कसुरी अहवाल वरीष्ठांकडे पाठविण्यात आला होता.

गलथान कारभार आला होता चव्हाट्यावर
गेल्याच महिन्यात जिल्ह्यातील 72 पोलिस कर्मचार्‍यांना कोर्ससाठी मुख्यालयात जमा केल्यावर वाहतूक शाखेतील हप्तेखोरीचा भांडाफोड झाला होता. प्रत्येक ठिकाणाहून शहर वाहतूक शाखेबाबत तक्रारी येवू लागल्याने पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी यांनी स्वत: चौकशीला सुरुवात केली. शनिवारी पोलिस अधीक्षकांनी जळगाव शहर वाहतूक शाखेतील एका महिला कर्मचार्यासह दोघांना मुख्यालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. कर्तव्यात कसुर असा ठपका ठेवत पोलीस अधिक्षक डॉ.उगले यांनी सोमवारी कुनगर यांची तडका- फडकी बदली केली. संध्याकाळी हजेरीवर आल्यानंतर निरीक्षक कुनगर यांना चक्क नियंत्रण कक्षात हजर होण्या बाबत सुचना करण्यात आल्या, साडे आठ वाजेच्या सुमारास कुनगर यांनी चार्ज सोडून नियंत्रण कक्षात हजेरी नोंदवली.


कॉपी करू नका.