भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात भूगोल सप्ताहाचे उद्घाटन
भुसावळ : कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळ आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण भुसावळ आयोजित भूगोल सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे होत्या. मार्गदर्शक म्हणून वरीष्ठ स्तर दिवाणी न्या. आर.आर.अहिर होते.
यांची प्रमुख उपस्थिती
भूगोल विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.लढे, भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे, प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.भूषण धनगर, राहुल पाटील, प्रशांत लाड, जगदीश मानकर, भूगोल मंडळ सचिव शुभम सपकाळे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला कै.उपप्राचार्य सी.सी.कोल्हे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून व पृथ्वी पूजन करून व दीपप्रज्वालन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रमुख मार्गदर्शक न्या.आर.आर.अहिर यांनी आपल्या व्याख्यानात नागरीकाची दहा व कलम 51 अ नुसार नवीन आलेले एक अशा 11 मुलभूत कर्तव्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यामध्ये त्यांनी राज्यघटनेचे पालन करणे, राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष कसा होता याचा प्रचार प्रसार करणे, देशसेवा करणे, संस्कृती जोपासणे अशा विविध मार्गदर्शक तत्वांचा सार सांगितला. यानंतर प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, नागरीकशास्त्र हे आपल्याला आपल्या गुरुजनांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकविले जाते. या नागरीक शास्त्राचा आपण जर अंगीकार केला तर आपला देश उत्तम होऊ शकेल. संविधान काय आहे त्याचा अभ्यास कुणीकुणी करून आपल्या समोर मांडलेले आहे याचा विचार करावा तसेच आपल्या भारतात जी विविधता आहे त्यातून जी एकता दिसते ते आपल्या संस्कृतीचे लक्षण आहे, असे मनोगत सांगितले. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील, तर आभार प्रा.अजय तायडे यांनी मानले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रा.मीनाक्षी बेदरकर तसेच प्रास्ताविक भूगोल सप्ताह समन्वयक प्रा.अनिल हिवाळे यांनी मानले.



