खेलो-इंडिया-खेलोच्या राष्ट्रीय स्पर्धेत रावेरच्या उदय महाजनला सिल्व्हर


रावेर- देश्याच्या खेलो-इंडिया-खेलोच्या गुवाहाटी (आसाम) मध्ये स्पर्धा सुरू असून यामध्ये वेटलिप्टिंग क्रीडा स्पर्धेत सरदार.जी.जी.हायस्कूलमधील विद्यार्थी उदय अनिल महाजन याने 49 किलो वजनी गटात 176 किलो वजन उचलून सिल्व्हर पदक पटकावले. राष्ट्रीय खेलो-इंडिया-खेलोच्या गुवाहाटी (आसाम) मध्ये स्पर्धा सुरू असून वेटलिप्टिंग स्पर्धेत उदय महाजन याने यश मिळवले. हा खेडाळु प्रशिक्षक अजय महाजन मार्गदर्शनात व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील जिमखान्यात सराव करतो. त्याच्या यशाबद्दल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजूमदार, मुख्याध्यापक शिरीष वाणी, उपप्राचार्य जी.टी.पाटील, उप मुख्याध्यापक तडवी, पर्यवेक्षक टी.बी.महाजन पर्यवेक्षक ई.जे.महाजन, क्रीडा शिक्षक जे.के.पाटील, युवराज माळी, क्रीडा शिक्षक उमेश पाटील, जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मिसर, संजय मिसर, राजेश शिंदे, आमोद महाजन, प्रकाश बेलस्कर, यशवंत महाजन, नाना महाजन, संदीप महाजन, भूषण महाजन, लखन महाजन, अविनाश पाटील, नितीन महाजन यांनी अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !