सैन्य दलात अजंदेच्या विवाहितेची निवड : रावेरात सहृदय सत्कार


रावेर : तालुक्यातून सैन्य दलात निवड झालेल्या प्रथम महिला उज्वला मांडवकर यांचा सत्कार शहरातील माऊली फांऊडेशन संचलित आदित्य इंग्लिश मेडियम स्कूलवतीने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. रावेर तालुक्यातील अजंदे येथील सासरवाशीन उज्वला मांडवकर यांची नुकतीच भारतीय सैन्यात निवड झाली असून त्या तालुक्यातुन सैन्यात जाणार्‍या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यांची निवड झाल्या बद्दल रावेर शहरातील माऊली फांऊडेशनच्या वतीने आदित्य इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये तहसीलदार उषाराणी देवगुणे, संस्थाध्यक्ष डॉ.संदीप पाटील, सचिव डॉ.योगीता पाटील यांनी सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, उर्दू केंद्र प्रमुख कमालुद्दीन शेख, मुख्यध्यापक संजय पाटील, मनीषा सोहणी, पत्रकार दीपक नगरे, गौरागिनी कोळपकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संखने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !