फैजपूर शहरात 32 वर्षीय महिलेला एकाची मारहाण
A 32-year-old woman was beaten up in Faizpur city यावल : शहरातील खाटीक वाड्यात एकाने दारू पिऊन शिवीगाळ केली व कोणाला शिवीगाळ करीत आहे याची विचारणा करणार्या 32 वर्षीय महिलेस त्याने थेट वीट फेकून मारत दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
फैजपूर शहरातील खाटीक वाडा भागातील रहिवासी छाया सुधाकर नाळे (32) यांना त्यांच्या घरासमोरील मंगेश संजू कसाब (भिल्लवाडा, फैजपूर) हा तिथे येवुन दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता. त्यास महिलेने सांगितले की, रात्र आहे तू कोणाला शिवीगाळ करतोय. याचा राग येऊन मंगेश कसाबने या महिलेला हातातील वीट डोक्यावर फेकून मारली त्यात महिलेच्या डोके फुटले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात मंगेश कसाबविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे.
