मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय झाले ‘चकाचक’
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहिम
मुक्ताईनगर : उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रत्यक्ष सहभागाने शिवसेनेच्या वतीने भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता झाल्यानंतर राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह आमदार पाटील यांनी माल्यार्पण केले व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आमदारांनी दाखवली कर्तव्याची चुणूक
आमदार चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काय ? आणि कसे असते? सर्वसामान्य लोकांना लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. शनिवारी शस्त्रक्रियेच्या आधुनिक साहित्यानी अद्यायवात अशा ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करतांना त्यांना येथे प्रचंड घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य दिसून आल्याने त्यांनी लागलीच राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या परीसरात स्वच्छता मोहिम राबवून करण्याची सूचना केली होती व त्याचे पालन शिवसैनिक व पदाधिकार्यांनी केले.
स्वच्छतेसाठी स्वतः झटले आमदार
रविवार, 12 रोजी सकाळीच आमदार पाटील व शेकडो शिवसैनिक पदाधिकारी यांची टीम ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. निव्वळ बोट ठेवून कामे न करता स्वतः सहभागी होत कार्य तडीस नेण्याची हातोटी असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वात आधी रुग्णालयात साफसफाई मोहीम फत्ते केली व मोठ्या उत्साहात डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह उपस्थितांसोबत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यानंतर दत्तप्रभु कन्स्ट्रक्शनचे तुषार बोरसे यांच्या सौजन्याने बाहेरील परीसर स्वच्छ करण्यात आला. शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकांनी हातात झाडू घेऊन परीसर स्वच्छ केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी डॉ.योगेश राणे, डॉ.नम्रता अच्छा, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, तालुकाप्रमुख छोटू भोई, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, माजी सरपंच मुशीर मणियार, जाफर अली, जहिर शेख, सलीम खान, शकुर जमादार, विधानसभा संघटक अमरदीप पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, पिंटू पाटील, विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले, गटनेता राजेंद्र हिवराळे, महेंद्र मोंढाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, पंकज राणे, नामदेव भिल्ल, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, गौरव दुट्टे, सोपान मराठे, शुभम शर्मा, चेतन कांडेलकर, राजू कापसे, रीतेश सोनार, स्वप्नील श्रीखंडे, गौरव काळे, मुकेश डवले, शुभम तळेले, मनोज मराठे, प्रमोद सौंदळे, पप्पू मराठे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

