जळगावात खुबचंद साहित्यांवर हल्ला : माजी महापौर ललित कोल्हेंवर गुन्हा


जळगाव : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (50, रा.सिंधी कॉलनी) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी माजी महापौर तथा भाजपचे सभागृह नेते ललित विजयराव कोल्हे व यांच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्यात घडली. या हल्ल्यानंतर जिमखान्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआर लांबविल्यात आला. नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्याजवळ गुरुवारी रात्री आठ वाजता खुबचंद साहित्या व ललित कोल्हे यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. साहित्या यांचा मुलगा नितीन याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, कोल्हे व त्यांच्यासोबत असलेल्या सात ते आठ जणांनी खुबचंद यांना जिमखान्याच्या आवारात मारहाण करीत नंतर जिमखान्यात आणले. तेथे लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. हल्ला करताना काही तरी टणक वस्तूचा वापर झाला. त्यात साहित्या यांच्या डोक्याला, नाकाला व पोटात बेदम झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत साहित्या यांना सोडून कोल्हे व त्यांचे सहकारी तेथून निघून गेले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !