आमोदेत दोन गटातील हाणामारीनंतर दुचाकी पेटवली


फैजपूर : जवळच असलेल्या आमोदे गावात दोन गटातील वादानंतर दुचकी पेटवून देण्यात आल्याची घटना बुधवारी राी घडली. दुचाकीचा हॉर्न वाजवल्याचा राग आल्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार अक्षय यशवंत तायडे यांच्या पाठीवर, हातावर मारहाण संशयीत आरोपी तुषार संतोष कठोरे याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे तर संशयीत आरोपी विकास विश्वनाथ शिंदे याने धारदार शस्त्राने भूषण आनंदा तायडे यास पोटावर वार केल्यानंतर संशयितांनी ईश्वर हरी सपकाळे याची दुचाकी पेटवून दिली. दुचाकीचा हॉर्न वाजवण्यास अक्षय यशवंत तायडेेने विरोध केल्याचा राग आल्यानंतर संशयीत आरोपी विकास विश्वनाथ शिंदे, ईश्वर हरी सपकाळे, तुषार संतोष कठोरे, लोकेश अरुण सपकाळे, हेमंत सुभाष सपकाळे, उमेश सपकाळे यांनी अक्षय यशवंत तायडे यास मारहाण केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी दुसर्‍या गटातर्फेही तक्रार देण्यात आली. विकास विश्वनाथ शिंदे (वडर) यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी सायंकाळी संशयीत आरोपी संतोष तायडे, राहुल तायडे, दीपक लहू तायडे, शुभम आनंदा तायडे, राधे तायडे, भूषण आनंदा तायडे, अक्षय यशवंत तायडे, आनंदा तायडे यांनी फिर्यादी विकास शिंदे यांना मारहाण केली तर संशयीत आरोपी भूषण आनंदा तायडे याने ईश्वर सपकाळे याची दुचाकी पेटवली. तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे तपास करीत आहेत.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !