दरोड्याच्या गुन्ह्यातील पसार आरोपी 19 वर्षांनी जाळ्यात


जळगाव- दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल 19 वर्षांपासून पोलिसांना चकमा देणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1 ऑगस्ट रोजी शिरपूर येथे पाठलाग करून पकडले आहे. शिवा उर्फ भिवा फुला भिल (वय 45 रा.खामखेड ता.शिरपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनातील भादंवि कलम 395,397 मधील आरोपी भिवा हा सन 2000 मध्ये गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. भिवा हा 1 ऑगस्ट रोजी शिरपूर येथे येणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दादा पाटील, विनोद पाटील, अरुण राजपूत, किशोर राठोड, रणजित जाधव, किरण चौधरी, हरीष परदेशी यांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आरोपीच्या शोधासाठी पाठवले होते. पोलिस पथकाने शिरपूर ते खामखेडा या अंतरादरम्यान पाठलाग करून त्याला पकडले.


कॉपी करू नका.