फैजपूरात संविधान बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन
फैजपुर : संविधान बचाव, देश बचाव, सीएए, एनपीआर, एनआरसी रद्द करण्यासाठी शुक्रवारी फैजपूर येथे संविधान बचाव कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत फैजपूर येथील कै.लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हाजी अब्दुल रऊफ जनाब, अशोक भालेराव, डॉ.अब्दुल जलील, भीम आर्मी प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे (जोजो), अॅड. खालीद शेख, मौलाना ताहेर पटेल, हाफिज इकबाल, हाफिज अनस, हाफिज वसीम, असगर सैय्यद, शेख सादिक शेख हसन, कालु मिस्तरी, अजमत शेख मुनाफ, चंद्रकला इंगळे, रेखा मेढे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी संविधान जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत जिंदाबाद या घोषणांनी तब्बल दोन तास धरणे आंदोलन स्थळ दणाणून सोडण्या आले. यावल तहसीलचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांनी निवेदने स्वीकारले. या धरणे आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भीम आर्मी सेनेतर्फे भीम आर्मी प्रदेश प्रवक्ता रमाकांत तायडे (जोजो) यांनी पाठींबा दिला. यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक शेख जफर, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,शेख जलील हाजी अब्दुल सत्तार,शेख इरफान, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अन्वर खाटीक, युवक काँग्रेस शहराध्यक्ष वसीम जनाब, आसीफ मॅकनिकल, शेख रईस मोमीन, शाबाजखान, याकूबखान, हाजी फिरोज शेख इब्राहिम, सलीम खान उस्मान खान, मुदस्सर नजर, डॉ.इमरान शेख, शेख कामिल, सईद मिस्तरी यांच्यासह संविधान बचाव कृती समितीने परीश्रम घेतले. सूत्रसंचालन मलक आबीद यांनी केले.

