नाडगावात किक्रेट वादातून दंगल : दोघांना अटक


दोन्ही गटाच्या 31 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा : पोलिसांचा गावात कडेकोट बंदोबस्त

बोदवड : तालुक्यातील नाडगाव रेल्वे स्टेशनजवळील नांदगाव-प्रतिभानगर येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या मैदानात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील 31 जणांविरुद्ध बोदवड पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दोघे आरोपी जाळ्यात
नाडगावात उद्भवलेल्या वादानंतर मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश शिंदे, बोदवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणली. एका गटातील संशयीत आरोपी भास्कर पवार व किरण मोरे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

दोन्ही गटाच्या 31 जणांविरुद्ध गुन्हा
तालुक्यातील नाडगाव रेल्वे स्टेशन रोड जवळील प्रतिभा नगराजवळील क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पहिल्या गटातर्फे भास्कर पंढरी पवार यांनी फिर्याद दिली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता माझा भाऊ सदाशिव वाघ व त्यांचा मित्र किरण मोरे यांना गणेश पवार, शुभम वाघ, विकी गुरचळ, निलेश गुरचळ, सुरज इंगळे, श्रावण इंगळे, शिंदे शिख, आकाश बच्छाव, अजय भालेराव, छोटु, अजय गवळी, बिंटू भाचा, राहुल इंगळे, सतीश, विशाल चव्हाण, शुभम इंगळे, मुकेश तायडे (जितू पुर्ण नाव माहित नाही), नाना म्हस्के, बंटी अवचारे, शिवाजी कोल्हे यांनी शिवीगाळ व मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. दुसर्‍या गटातर्फे सुरेश प्रकाश इंगळे यांनी फिर्याद दिली. दीपेश राणा, निखील निळे व त्यांचा लहान भाऊ (पुर्ण नाव माहित नाही), सदाशीव पंढरी पवार, रामा सारवान, विशाल देवकर, भास्कर पवार, जीवन मोरे, मनोज मोरे, संदीप मोरे, विकास गायकवाड, शेंड्या उर्फ किसन पवार यांनी नाडगाव येथे तलवार हातात घेऊन आपल्यासह मित्र शालिक पालवे, अनिल गुरचळ यांना तलवार, लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही गटातील 31 संशयीतांविरूद्ध दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीरक्षक भाईदास मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !