मुक्ताईनगरात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात धरणे आंदोलन
मुक्ताईनगर : नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी मुक्ताईनगर संविधान बचाव देश बचाव नागरी कृती समितीतर्फे चौफुलीवर प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सी.ए.ए. व एन.आर.सी.व एन.पी.ए.कायदा रद्द करण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
अनेक संघटनांनी दिला पाठिंबा
एन.आर.सी., सी.ए.ए. सारखे कायदे देशाच्या एकात्मतेला बाधक असून यामुळे देशाची हानी होईल यामुळे असे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली तसेच या मागणीसाठी संविधान बचाव देश बचाव नागरी कृती समिती मुक्ताईनगरतर्फे तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना मुक्ताईनगर विधानसभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुक्ताईनगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका, अल्पसंख्यांक सेवा संघ, जळगाव व भारतीय शहीद टिपू सुलतान सेना, मुक्ताईनगर व संभाजी बिग्रेड मुक्ताईनगर व मराठा समाज सेवा संघ मुक्ताईनगर, लोकसंघर्ष मोर्चा मुक्ताईनगर या संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला.



आंदोलनात यांचाही सहभाग
या आंदोलनात आमीर साहब, संविधान बचाव देश बचाव नागरी कृती समिती मुक्ताईनगरचे समन्वयक हकीम चौधरी, अफसर खान, आसीफ खान, शकील सर, मस्तान कुरेशी, जाफर अली, कलीम मणियार, जहांगीर खान, मुशीर मणियार, आरीफ आजाद, शकील मेंबर, आसीफ पाणी वाले, मुख्तार खान, काँग्रेसचे रवींद्र पाटील, डॉ.जगदीश पाटील, आत्माराम जाधव, ईश्वर राहणे, आनंदराव देशमुख, बी.डी.गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे यु.डी.पाटी, लिलाधर पाटील, प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष लता ावकारे ,मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, बामसेफचे प्रमोद सौंदडे, अॅड.मनोहर खैरनार, विण्ष्णू रोटे, यासीन खान, विश्वनाथ मोरे आदी सहभागी झाले. यशस्वीतेसाठी नवाब किंग फाऊंडेशनचे अरबाज खान, अशफाक बागवान, अल्तमस खान, इरफान मणियार, रहिम खान, जकीर व किंग स्टार ग्रूप चे सर्व सदस्य उपस्थित होते. लब्येक फाऊंडेशनचे इम्रान बागवान, सादिक खटीक, रीजवान चौधरी, अकील रूस्तम, जुबेर अली, दाऊद टेलर, अल्तमस तालीब, अनिस पटेल, तौकीर अहेमद व मुक्ताईनगरातील सर्व मस्जिदचे मौलानांसह सर्व समाजबांधवांनी परीश्रम घेतले.
