सोनगीरजवळ उसनवारीच्या पैशातून एकाला जाळले : तिघांना अटक


सोनगीर : उसनवारीच्या पैशांचा वाद विकोपाला गेल्याने तिघांनी एकाला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली होती. या घटनेतील जखमी नंदु आधार पाटील (41, रा़ चिंचगल्ली, सोनगीर) याचा उपचार सुरू असताना शनिवरी मृत्यू झाला. या घटनेेनंतर सोनगीर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उसनवारीच्या पैशांचा वाद बेतला जीवावर
संशयीत आरोपी घनश्याम नाना गुजर, मंगेश गुजर आणि मख्खन गुजर (रा़ सोनगीर) व नंदू आधार पाटील यांच्या उसनवारीच्या पैशातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता व त्यातून आरोपींनी 17 रोजी सायंकाळी दोंडाईचा रोडवरील बसस्टेशनजवळील मोकळ्या नंदू पाटील यांना मारहाण करीत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते तर जखमी अवस्थेत पाटील यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते व संशयीत आरोपींनी पेटवून दिल्याबाबत पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून 18 रोजी पहाटे आरोपींविरुद्ध गुन्हादेखील दाखल होता. दरम्यान, उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे नंदू आधार पाटील (41) यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सोनगीर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परीस्थिती हाताळत आरोपींना अटक केली आहे. मृताच्या नातेवाईकांनी सोनगीर पोलिस ठाण्याबाहेर ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत संतापही व्यक्त केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !