भुसावळात पैशांचे आमिष दाखवत महिलेचे 78 हजारांचे दागिने लांबवले


78,000 jewels of a woman were made away with the lure of money in Bhusawal भुसावळ : शहरातील नंदनवन कॉलनीतील वयोवृद्ध महिला घराकडे पायी निघाल्यानंतर महिलेसह मुलाने बोलण्यात गुंतवून व पैशांचे आमिष दाखवून महिलेचे 78 हजारांचे दागिणे लांबवले. हा प्रकार जामनेर रोडवरील माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या घराजवळ सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल
उषा रमेश न्हावी (63, चक्रधर नगर, नंदनवन कॉलनी, भुसावळ) या वृद्धेच्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी 10 वाजता त्या गावावरून आल्यानंतर अष्टभूजा मंदिराजवळ उतरल्या व तेथून पायीच घराकडे निघाल्यानंतर अज्ञात मुलाने येत मला उज्जैनला जायचे आहे. माझ्याकडे पैसे नाही, मालकाने काम करून घेतले पण पैसे दिले नाही, असे सांगितले तसेच अन्य 35 ते 40 वर्षीय महिलेने मला मालकाने पाकीट बँकेत जमा करण्यासाठी दिले मात्र मला बँक माहित नाही, तुम्ही माझ्याबरोबर चला, असे सांगत वृद्धेचा विश्वास संपादन केला व पैशांचे आमिष वृद्धेला दाखवत वृद्धेकडील 78 हजार रुपयांचे दागिने काढून घेत महिलेच्या हाती रूमालात दगडाचे बारीक तुकडे करून व कागदाचे बंडल बांधून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !