कॅशियस स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे विभागीय बॉक्सिंग स्पर्धा


भुसावळ : जागतिक दर्ज्याचे क्ले बॉक्सर मोहम्मद अली यांच्या वाढदिवसानिमित्त कॅशियस स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे नाशिक विभागस्तरिय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन कंडारी जिल्हा परीषद शाळेच्या पटांगणावर 17 ते 20 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील सुमारे 205 पुरुष-महिला बॉक्सर सहभागी झाले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हस्ते जोडी लावून करण्यात आले. भविष्यात ही स्पर्धा राज्य व राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाईल, अशी घोषणा माजी आमदारांनी केली.

यांची होती उपस्थिती
भुसावळ तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व कॅशियस स्पोर्ट्स अ‍ॅकेडमीचे संस्थापक प्रशिक्षक राहुल घोडेस्वार, सचिव तथा एनआयएस बॉक्सिंग प्रशिक्षक सी.आर.गुप्ता, रेल्वे आणि राष्ट्रीयस्तरीय सुवर्ण पदक विजेते सुनील नवगिरे, रेल्वे राष्ट्रीयस्तरीय खेळाडू व रेल्वे प्रशिक्षक मनोज सूर्यवंशी, रेल्वे व राष्ट्रीय पदकविजेते सुंदर बारसे, राज्यस्तरीय एमबीए पंच पवन शिरसाट, दीपक कोळी (डीके), पीटर, मेघराज तल्लारे, संभाजी सोनवणे, यावल तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव व प्रशिक्षक पंकज तडवी, नाशिक येथील एमबीए पंच इम्तियाज शेख, लोकेश यादव, सिद्धार्थ सपकाळे, किरण कानसे,वीरेश हुसळे, पोलिस विभागातील दिनेश पाटील हे पंच म्हणून काम पाहत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी साजिद, मनीष, सिद्धार्थ ढिवरे, सुबोध गवळी, जुबेर, अविनाश ससाणे, विक्की मेश्राम, हर्षदीप घोडेस्वार, शुभम भोई, प्रतीक सुरवाडे, गुलाम, संदीप तायडे, ललित पवार आदी परीश्रम घेत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !