भुसावळात महिलेला जातीवाचक शिविगाळ : संशयित गणेश बोरेला अटक
Caste abuse to woman in Bhusawal: Suspect Ganesh Bore Arrested भुसावळ : ओले कपडे सुकण्यासाठी टाकल्यानंतर त्यातील पाणी संशयिताच्या घरात आल्याच्या रागातून संशयिताने 42 वर्षीय महिलेला जातीवाचक शिविगाळ करीत अपार्टमेंटच्या फळ्यावर महिलेविषयी अश्लील लिखाण केल्याची घटना रविवार, 4 जून रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील एका भागातील अपार्टमेंटमध्ये घडली होती. या प्रकरणी 42 वर्षीय महिलेने बुधवारी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित गणेश मारोती मोरे (भुसावळ) याच्याविरोधात अॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
किरकोळ कारणावरून महिलेला अश्लील शिविगाळ
42 वर्षीय महिला व संशयित बोरे हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. महिलेने कपडे धुतल्यानंतर ते गॅलरीत वाळत घातल्यानंतर ओल्या कपड्यांचे पाणी संशयिताच्या घरात गेले व त्यातून संशयिताने जातीवाचक शिविगाळ करीत माझ्या नांदी लागू नका, नाही तुम्हाला तुरूंगात टाकेल, मी उच्च जातीचा वकील आहे, अशी धमकी दिली तसेच अपार्टमेंटच्या सूचना फलकावर महिलेविषयी अश्लील शब्दात लिखाण केले. महिलेने शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.
