रावेरात सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर तत्काळ होणार कारवाई : पोलीस अधीक्षक एम.राजकुमार


रावेर : पोलीस दप्तरी संवेदनशील शहर म्हणून ख्याती असलेल्या रावेर शहरात आता 120 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर राहणार आहे त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर तातडीने आरोपी निष्पन्न करून त्याच्यावर कारवाई करता येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी येथे केले. रावेर पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा व विश्रामगृह उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, आयएएस अर्पित चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, परीविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, मुख्याधिकारी स्वालिया मालगावे, धनंजय चौधरी, दारा मोहम्मद उपस्थित होते.

रावेर शहरावर आता तिसर्‍या डोळ्याची नजर
रावेर शहरात सुमारे 17 लाख 25 हजार खर्च करून 120 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या निमित्ताने संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना तसेच गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पद्माकर महाजन, प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, बाजार समिती उपसभापती योगेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, दिलीप पाटील, अनिल अग्रवाल, योगेश गजरे, कन्हैया अग्रवाल, सादीक शेख, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, सोपान पाटील, ई.जे.महाजन, मुन्ना अग्रवाल, सुधाकर नाईक, डॉ.सुरेश पाटील, संतोष पाटील, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, पाटील, अशोक वाणी, उमेश महाजन, यूसुफ खान, गयास शेख, गयासुद्दीन काझी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !