वृक्षांवर चालवली बेकायदा कुर्‍हाड : खेडीच्या एकाविरोधात गुन्हा


Illegal ax driven on trees : A crime against a villager जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात महापालिकेच्या मोकळ्या जागेवरील झाडांवर कुर्‍हाड चालवत पर्यावरणाची हानी करणार्‍या खेडीतील एकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात यापूर्वी महापालिकेने दंडात्मक नोटीस बजावली मात्र त्यानंतरही दंड भरण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली.

असे आहे नेमके प्रकरण
खेडी शिवारातील गट नंबर 48/1 मधील मोकळ्या जागेवर दोन लिंबाची झाडे लावण्यात आली होती. चंद्रकांत पांडूरंग जोशी (खेडी, ता.जि.जळगाव) यांनी 6 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सदरील दोन निंबाची झाडे व एका झाडाची फांदी तोडून टाकली. या संदर्भात जळगाव महापालिकेने चंद्रकांत जोशी यांना 25 हजाराच्या दंडाची नोटीस बजावली होती. दरम्यान महापालिकेने बजावलेली नोटीसीची कोणतीही दखल न घेतल्याने महापालिकेचे अधिकारी बाळासाहेब बळवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जोशी यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !