मुंबई-पुणे महामार्गावर अपघात : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी


पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या अपघातात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या आहेत. अपघात झाला त्यावेळी शबाना आझमी यांचे पती ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हेदेखील त्यांच्याच मागे असलेल्या कारमध्ये होते. अपघातात शबाना आझमी यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शबाना आझमी यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. शबाना आझमी मुंबईहून लोणावळा येथे जात होत्या त्यावेळी शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !