घरासाठी पाच लाख न आणल्याने तसेच चारीत्र्यावर संशय घेत भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीविरोधात गुन्हा
Harassment of a married woman in Bhusawal for not bringing five lakhs for the house and suspecting her character : Crime against husband भुसावळ : चारीत्र्यावर संशय घेत तसेच माहेरून मुलाच्या शिक्षणासाठी व नवीन घर घेण्यासाठी पाच लाख रुपये न आणल्याने शहरातील विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पतीविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पट्ट्याने केली विवाहितेला मारहाण
पूनम हेमंत मेहरा (35, ठोके नगर, रींग रोड, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, पती हेमंत प्रेमशंकर मेहरा (ठोके नगर, रींग रोड, भुसावळ) याने 8 मार्च 2021 ते 13 जून 2023 याने मुलाच्या शिक्षणासाठी तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला तसेच मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला शिविगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. छळ असह्य झाल्याने विवाहितेने शहर पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार ईकबाल सैय्यद करीत आहेत.
