मुक्ताईनगरात कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक : 17 गुरांची सुटका ; त्रिकूटाविरोधात गुन्हा


Transport of cattle for slaughter purpose in Muktainagar : 17 cattle rescued; A crime against the trio मुक्ताईनगर : कत्तलीच्या उद्देशाने होणारी गुरांची वाहतूक मुक्ताईनगर पोलिसांनी रोखत 17 गुरांची सुटका केली. या प्रकरणी चालकासह तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री 11.30 वाजता लोहारखेडा-धाबेपिंप्री रस्त्यावर करण्यात आली.

तिघांविरोधात गुन्हा
ट्रक क्रमांक (एम.एच.09 एच.जी.4823) या ट्रकमधून अवैधरीत्या गुरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असता चालकाकडे गुरे वाहतुकीबाबत कुठलाही परवाना न आढळल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला तर संशयित मात्र पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल विजय पवार (33) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर चार लाख 25 हजार रुपये किंमतीच्या गोर्‍ह्यांची सुटका करून त्यांची रवानगी गो शाळेत करण्यात आली तर दोन लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. तपास गजमल पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !