यावल पोलीस ठाण्यात दोघांची पोलिसांना अश्लील शिविगाळ करीत धमकी
In Yaval police station, two threatened the police by insulting them यावल : यावल पोलीस ठाण्यामध्ये मोहराळा येथील दोघांनी येऊन पोलीस कर्मचार्यांना अश्लील शिविगाळ केली व टेबल ठोकून खुर्चीस लाथ मारून धक्काबुक्की केली. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमकी देत शासकिय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनाच धमकी देत निर्माण केला अडथळा
यावल पोलीस ठाण्याचे हवलदार अलाउद्दीन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यावल पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ सुनील पांडुरंग अडकमोल व सिंधुबाई पांडुरंग अडकमोल (दोन्ही राहणार मोहराळा, ता.यावल) हे आले होते व त्यांनी पोलीस कर्मचार्यांना अश्लील शिवीगाळ करून जोरजोरात टेबल ठोकले. ठाणे अंमलदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता उलट त्यांनी तू इथे नोकरी कसा करतो, हे बघून घेऊ असा दम दिला तसेच ठाणे अंमलदाराच्या बाजूला असलेली खुर्चीला लाथ मारून फेकून दिली व पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की करून गच्ची धरली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
