धक्कादायक ; पोदार शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळले गावठी पिस्टल : संशयित विद्यार्थी भुसावळातील रहिवासी


Shocking; Gavathi pistol found with Class IX student of Potdar School : Suspect student is a resident of Bhusawal भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील नवव्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने शाळेत प्रचंड खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार, 14 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अत्यंत प्रतिष्ठीत शाळेतील विद्यार्थ्याकडेच गावठी कट्टा आढळल्याने या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे तर या विद्यार्थ्याने हा कट्टा कुठून वा का आणला? या बाबीचा फैजपूर पोलिसांकडून तपास सुरू  आहे.

दप्तर तपासणीत आढळला कट्टा
भुसावळातील एका भागातील रहिवासी असलेल्या कर्मचार्‍याचा मुलगा अकलूदजवळील पोदार शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर नववीच्या एका विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला.

शाळा प्रशासनाला ही बाब कळवल्यानंतर फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ व सहकार्‍यांनी धाव घेत कट्टा जप्त केला तर विद्यार्थ्यालाही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षकांच्या सतर्कतेने अप्रिय घटना टळली
पोदार शाळेचे प्राचार्य ए.एच.शहा म्हणाले की, शिक्षकांकडून अचानकपणे प्रत्येक विद्यार्थ्याचे दप्तर तपासले जाते. शुक्रवारी पिस्टल आढळल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला माहिती कळवली. विद्यार्थ्याबाबतचा निर्णय शिक्षक-पालक कमेटीच्या बैठकीनंतर घेतला जाईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !