जय बजरंग- 2, वीर भगतसिंग व फ्रीडम फायटरचे वर्चस्व
साकेगाव सरपंच चषक स्पर्धा : सामन्यांमुळे वाढली चुरस
भुसावळ- शहराजवळील साकेगाव येथे महामार्गालगत असलेल्या जिल्हा परीषद शाळेच्या मैदानावर ग्रामपंचायत साकेगाव, जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच्या सामन्यात फ्रीडम फायटरने त्रिमूर्ती बॉईजवर शेवटच्या चेंडूवर तर अन्य सामन्यात वीर भगतसिंग व जय बजरंग-2 आपले सामने जिंकले. सरपंच चषक स्पर्धा दिवसगणिक रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचत असून चौथ्या दिवशी झालेल्या अत्यंत रोमहर्षक त्रिमूर्ती विरुद्ध फ्रीडम फायटर यांच्यात झालेल्या सामन्यात त्रिमूर्ती संघाने प्रथम फलंदाजी करताना 78 धावा काढल्या तर प्रत्युत्तरात फ्रीडम फायटरने शेवटच्या षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक व थरारक सामन्यात विजयी धाव घेत विजय मिळवला. फ्रीडम फायटर च्या नितेश पाटीलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. जय महाराष्ट्र-2 व वीर भगतसिंग यांच्यात झालेल्या सामन्यात वीरभगतसिंग ने जय महाराष्ट्र -2 वर सात गड्यांनी विजय मिळवला. वीर भगतसिंगच्या निखील पाटीलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. धिंगाना ग्रुप विरुद्ध जय बजरंग-2 या सामन्यात जय बजरंग -2 ने धिंगाणा ग्रुपवर आठ धावांनी विजय मिळवला. जय बजरंग-2 च्या शुभम परदेशीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यांचा टॉस वीट भट्टी व्यावसायीक महेंद्र कुंभार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
उद्या महामुकाबला
रविवार, 19 रोजी स्पर्धेत महामुकाबले होणार आहेत .यात सामन्याआधीच अंतिम सामना योद्धा व एम्पायर मल्हार या संघामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. दोघाही संघांनी चषकवर यापूर्वी आपले नाव कोरले आहे.
यानंतर ओम साई ग्रुप व मातृभूमी यांच्यात दुसरा सामना ही अत्यंत अटीतटीचा होणार आहे. दोघा संघाने ही सरपंच चषकाचा मान यापूर्वी पटकाविला आहे. तिसरा सामना ए.एन दंगल व जय बजरंग यांच्यात होणार आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी महामुकाबला पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी राहणार आहे.

