मोहराळा येथे क्रिकेट खेळणार्‍या तरुणास मारहाण


A youth playing cricket was beaten up in Moharala यावल : तालुक्यातील मोहराळा येथे 28 वर्षीय तरुणाला क्रिकेट खेळताना मारहाण करून शिविगाळ करण्यात आली तसेच तरुण घरी जात असताना त्याचा रस्ता अडवून त्याला पुन्हा मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून केली मारहाण
मोहराळा, ता.यावल येथील हारून सलीम तडवी (28) या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहरळा गावात सय्यद अशपाक यांच्या पडीत शेतात ते क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असतांना काही एक कारण नसतांना सतीश पांडुरंग अडकमोल हा तेथे आला व त्याने तडवी याला शिविगाळ केली नंतर तरुण हा घरी परत जात असताना त्याचा रस्ता अडवून अश्लील शिविगाळ करून त्याला मारहाण करण्यात आली व ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !