भुसावळात अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरची विद्यार्थ्याला धडक

अवैध वाळू तापली : पोलीस व महसूल प्रशासनाची कारवाईकडे डोळेझाक


A student was hit by a dumper transporting illegal sand in Bhusawal भुसावळ : शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या माफियांची मनमानी वाढली असून आता कॉलनी भागातूनच वाहतूक सुरू झाल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असताना एका शाळकरी विद्यार्थ्याला अवैध वाळू वाहतुकीच्या डंपरने उडवल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता गजानन महाराज नगरातील पद्मावती अपार्टमेंटजवळ घडली.

अपघातानंतर डंपर चालक पसा
या अपघातात रणवीरसिंग गुजराल (15, भुसावळ) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात विद्यार्थी पडलेला पाहताच डंपर चालकाने धूम ठोकली. या प्रकरणी शहर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून गंभीर अवस्थेत विद्यार्थ्याला जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शाळेतून परतताना अपघात
शहातील सेंट अ‍ॅलायसेंस हायस्कूलचा दहावीतील विद्यार्थी रणवीर गुजराल (15) हा शनिवारी दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर आपल्या गजानन महाराज नगरातील गणेश अपार्टमेंटमधील घराकडे निघाल्यानंतर त्याच्या स्कूटी (एम.एच.19 बी.एल.1985) ला पद्मावती अपार्टमेंट जवळील चौफुलीवर समोरुन येणार्‍या भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.3513) ने जोरदार धडक दिली. या अपघातात रणवीरच्या दोन्ही पाय व हाताला गंभीर दुखापत झाली तर अपघात घडल्यानंतर डंपरवरील चालकाने पळ काढला.

अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई कधी ?
परीसरातील नागरिकांनी धाव घेवून जखमी रणवीरला शहरातील खाजगी रुग्णालयात हलवले मात्र रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगावातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. शहर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी सबंधीत डंपरच्या मालकासह चालकावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !