न्हावी येथे अपघात : जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Accident at Nhavi : Injured youth dies during treatment यावल : यावल तालुक्यातील न्हावी येथे गाडीवरून जात असतांना घराबाहेर एका 37 वर्षीय तरुणाचा अपघात घडला होता. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्र करणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
उपचार सुरू असताना ओढवला मृत्यू
न्हावी, ता.यावल येथील जितेंद्र ज्ञानदेव गाजरे (37) हा तरुण आपल्या घराच्या बाहेर गाडीवरून जात असताना घराबाहेरच गाडीच्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला तेथून प्रारंभी सावदा आणि नंतर डॉ. उल्हास पाटील फाऊंडेशनच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवलदार राजेश बर्हाटे करीत आहे.
