वरणगाव शहरात पेन्शनरचे घर फोडले : 19 हजारांचा मुद्देमाल लांबवला
A pensioner’s house was broken into in Varangaon City : 19 thousand worth of property was recovered भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे सेवानिवृत्त कर्मचार्याच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 19 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना 6 ते 16 जूनदरम्यान डली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घर बंद असल्याची साधली संधी
सुभाष भीमराव सुरवाडे (63, सम्राटनगर, वरणगाव) हे सेवानिवृत्त पेन्शनर आहेत. ते गावाला गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत घराचे कुलूप तोडून घरातील पाच हजार रुपये किंमतीचा एलईडभ टीव्ही, चार हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर, दहा हजार रुपये किंमतीचे तांबा-पितळीचे भांडे असा एकूण 19 हजारांचा मुद्देमाल लांबवला. सुरवाडे हे गावाहून परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेंद्र सीताराम तायडे करीत आहेत.
