भुसावळात वाद मिटवताना तरुणाचे डोके फोडले : दोघांविरोधात गुन्हा
A young man’s head was smashed while settling a dispute in Bhusawal : Crime against both भुसावळ : घरगुती भांडणातून तक्रारदाराच्या बहिणीसोबत सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराचे वीट मारून डोके फोडण्यात आल्याची घटना बहारे मदिनी मशिदीजवळ शनिवार, 17 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून तरुणाचे डोके फोडले
ईस्लाम सैय्यद बशीर (24, बहारे मदिना मशिदीजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित हे त्यांच्या बहिणीसोबत वाद घालून भांडण करीत असताना त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लाथाबुक्क्यांनी डोक्यावर व पोटावर मारहाण केली तसेच संशयित ताज शेख जमीन याने वीट डोक्यात मारल्याने त्यांचे डोके फुटले. या प्रकरणी ताज शेख जमील व अब्बास जमील शेख (बहारे मदिना मशिदीजवळ, खडका, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक शशिकांत तायडे करीत आहेत.
