भुसावळात घरफोडी : 27 हजारांचा ऐवज लंपास
Burglary in Bhusawal : 27 thousand in lieu of compensation भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून यशोधरा नगर, संबोधी विहारामागे घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत 27 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
अलका समाधान सुरवाडे (41, यशोधरा नगर, संबोधी विहारामागे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 16 जून रात्री 11.30 ते 17 जूनच्या पहाटे पाच दरम्यान चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधून कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील 24 हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स तसेच तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण 27 हजारांचा ऐवज लांबवला. शनिवारी सुरवाडे या गावाहून आल्यानंतर घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्यांनी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार नेव्हील बाटले करीत आहेत.
