धक्कादायक ! : दुसर्याचे घर आपलेच असल्याचे भासवत भुसावळातील दाम्पत्याला घातला 11 लाखांचा गंडा
A couple in Bhusawal was cheated of 11 lakhs by pretending that someone else’s house was their own भुसावळ : दुसर्या ईसमाचे घर हे आपलीच मालमत्ता असल्याचे भासवून संशयिताने भुसावळतील दाम्पत्याला सुमारे 11 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयिताविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फोन पे द्वारे स्वीकारली रक्कम
शबनमबी असलम खान (33, ईमामवाडा, न्यू सातारा फाईल, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित साजीद खान मुसा खान (पंधरा बंगला, जलाल शाह बाबा दर्ग्याजवळ, भुसावळ) याने 12 सप्टेंबर 2022 ते 3 जानेवारी 2023 दरम्यान खडका ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 5/2/1 मधील प्लॉट नंबर 29, क्षेत्र 184.78 चौरसमीटर असलेला टू बीएचके घर आपली मालमत्ता असल्याचे भासवले व घराच्या सौद्यापोटी 10 लाख 71 हजार 42 रुपये रक्कम पती असलम खान यांच्या खडका रोडवरील दुकानात फोन पे द्वारे स्वीकारली.
गोळीने ठार मारण्याची धमकी
घराचा ताबा मागितल्यानंतर संबंधिताने टाळाटाळ केली व तपास केल्यानंतर ही मालमत्ता दुसर्याच्या नावे असल्याचे कळताच दाम्पत्याने संशयिताकडे रोख रक्कम मागितल्यानंतर संशयिताने पैशांसाठी तुम्ही तगादा लावत असल्याने तुम्हाला गोळी घालून ठार मारू, अशी धमकीही दिली. महिलेच्या तक्रारीवरून संशयित साजीद खान मुसा खान (पंधरा बंगला, जलाल शाह बाबा दर्ग्याजवळ, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.
