बोरखेडा हत्याकांड : भुसावळ सत्र न्यायालयात आज सुनावणी


Borkheda Massacre : Hearing in Bhusawal Sessions Court today भुसावळ :  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौघा भावंडाची हत्या करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात घडली होती. या हत्याकांडाच्या नियमित सुनावणीला भुसावळ सत्र न्यायालयात सुरूवात झाली असून सोमवार, 19 रोजी या खटल्याची सुनावणी होणार असून पोलीस अधिकार्‍यांसह आठ जणांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे साक्षीदारांची सरतपासणी घेतील.

चौघा भावंडांची झाली होती हत्या
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 या दिवशी रात्री शेतात दोन मुले, दोन मुली अशांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्याचवेळी अन्य भावंडांना जाग आल्याने त्यांचीदेखील हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी संशयीत महेंद्र सीताराम बारेला हा अटकेत असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सोमवारी दोन वैद्यकीय अधिकारी, खटल्याचे तपासाधिकारी, तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. संशयीतातर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल हे उलट तपासणी घेतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !