पीएम किसान योजनेचे काम करण्यास नकार


रावेर तालुक्यातील तलाठ्यांच्या पवित्र्याने योजना लालफितीत अडकण्याची भीती

रावेर : शेतकर्‍यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान संदर्भात काम करण्यास रावेर तालुक्यातील तलाठ्यांनी स्पष्टपणे नकार दिल्याने ही योजना लालफितीत अडकण्याची भीती आहे. तालुक्यातील तलाठ्यांनी तहसी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पीएम किसान योजना कृषी खात्याशी संबंधीत असून ती बळजबरीने महसूल विभागाकडे सोपवण्यात आली आहे. आतपर्यंत अशा अनेक योजना महसुल विभागाचा संबंध नसतांना महसुल विभागावर लादण्यात आल्या आहे. पीएम किसान योजना राबवताना तलाठ्यांच्या मूळ कामावर याचा मोठया प्रमाणात परीणाम होत आहे. ही योजना ही नेहमी सुरुरूराहणार असल्याने तलाठी यांच्यावर अतिरीक्त कामाचा ताण वाढणार असल्याचे निवेदनात तलाठ्यांनी म्हटले आहे.

योजने संदर्भात अशा समस्या
प्रधामंत्री किसान सन्मान योजनेसंदर्भात अनेक शेतकर्‍यांचे आधार कार्डवर नाव चुकले आहे शिवाय बँक खात्याचा क्रमांक चुकणे, आयएएफसी कोड चुकणे आदी कारणांमुळे योजनेचा लाभ शेतकर्‍यांना देण्यात अडचणी येत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील 41 टक्के शेतकर्‍यांच्या बँक समस्या संदर्भात तर 49 टक्के शेतकर्‍यांनी आधारसंदर्भात समस्या मांडल्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !